अक्कलकोटी ..
अक्कलकोटी जाता
जीवन सार्थक कळे
ओढलागे पादुकांची
पाऊल परत ते वळे
चैतन्याचे आविष्कार
कर आपसूक रे जुळे
मुख कमल प्रभावान
गा दृष्टी तिथेचं खिळे
स्वामीनाम जयकारा
मने सु स्नात निर्मळे
भावभक्तीची विभूति
सुवास परिसर दर्वळे
निर्माल्य होताचरणी
फुलले फुलांचे मळे
दुःखआले परत गेले
सुरक्षित सद्गुरु मुळे
भोग कुणा न चुकले
रे वेदना निदान टळे
पाप पुण्य जसे जमा
तशीचं मिळती फळे
स्वामीवरी भार टाकू
होऊ आपण मोकळे
स्वामीसेवेत रममाण
एवढेच फक्त रे कळे
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
Users Today : 14