साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी जीवनाचे रान करून समाजाला न्याय देण्याचे काम केले अशा महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसीलदार यांना दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी निवेदन देण्यात आले या भारत देशाला लेखणीच्या माध्यमातून कादंबरी साहित्य च्या माध्यमातून जनजागृती केली अशा महापुरुष यांना भारतरत्न पुरस्कार पासून वंचित ठेवल्या गेले ज्यांनी देशासाठी काही योगदान दिले नाही अशांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले जे फक्त पैशासाठी खेळणारे आणि गाणी बोलणारे अशांना भारतरत्न दिले जाते आपल्या या देशांमध्ये हजारो लोकांनी लाखोच्या निवेदन आज त्या मंत्रालयामध्ये कचऱ्यात पडले असतील निवेदनाची दखल आतापर्यंत कोणीही घेऊ शकले नाही लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या या मागणीसाठी या भारतात कित्येक आंदोलन मोर्चा झाले पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे झोपेचे सोंग घेत आहे बाहेर देशात जाऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण करतात पण लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून निस्वार्थपणे समाजकार्य केले अशा महापुरुषांना केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना वंचित ठेवत आहे अशा सरकारचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करतो लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना त्यांच्या गौरव करून सन्मानित करावे अन्यथा लोकशाही मार्गाने रिपब्लिकन सेनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला. रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हा साळवे, जिल्हा महासचिव शेख सलीम , तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर सदस्य गोलू श्रीसागर, शहर सदस्य दीपक तायडे इत्यादी होते.