नगावच्या सरपंचपदी अनिता रविंद्र पाटील बिनविरोध माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार.

Khozmaster
1 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार (प्रतिनिधी)- नगाव ता. नंदुरबार येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी  अनिता रवींद्र पाटील यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  नियुक्ती झाल्यानंतर आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नूतन सरपंचांच्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
       नंदुरबार तालुक्यातील नगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात अनिता रवींद्र पाटील यांच्या एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
    शुक्रवारी आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नूतन सरपंच पाटील यांच्या सत्कार केला.
    याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, शेती सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,जि.प सदस्य देवमन पवार,माजी जि.प सदस्य अंबु पाडवी,बाजार समिती संचालक दिनेश पाटील,भालेरचे उपसरपंच गजानन पाटील,नगावचे उपसरपंच रोहिदास ठाकरे,युवराज पाटील,बापू पाटील,भटा पाटील, वेडू पाटील,गुलाब पाटील,नाना पाटील,नाना चव्हाण,कमलेश पाटील,नाना ठाकरे,अधिकार धनगर,दिलीप पाटील,प्रवीण पाटील,मुकेश पाटील अशोक पाटील उपस्थित होते.

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *