नागपूरातून एक महत्त्वाची बातमी…

KHOZ MASTER
1 Min Read

शिवसेना, शिंदे गटाचे सामाजिक कार्यकर्ते प्रेम उर्फ हितेश मुंदाफळे यांच्या नेतृत्वात अन्न पुरवठा विभागाला आज निवेदन सादर करण्यात आले आहे.
गरीब आणि गरजू नागरिकांना वेळेवर आणि नियमितपणे रेशन मिळावे, ही या निवेदनामागची प्रमुख मागणी आहे. १० एप्रिल रोजी अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमान, तसेच नागपूर जिल्हा अध्यक्ष सुरज गोजे आणि शहर अध्यक्ष समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक पात्र लाभार्थ्यांना वेळेवर रेशन मिळत नाही. तांत्रिक अडचणी आणि नियमांच्या गुंतागुंतीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे प्रशासनाने तात्काळ योग्य पावले उचलून सर्व पात्र नागरिकांना नियमित आणि सुरळीत रेशन वितरण सुनिश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रवीण इंगोले, प्रमोद टाकसांडे, विक्की शंभरकर, स्वप्निल शेंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जर प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

0 9 5 9 9 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *