तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 7 जानेवारी 2024 ते 11जानेवारी2024 पर्यंत पायी दिंडी चे आयोजन करण्यात आले आहे,
सदर दिंडी ही शहरातील संत सावता महाराज मंदिर माळीपुरा येथून दिंडी चे प्रस्थान होते त्या नंतर श्री बालाजी महाराज मंदिर येते दर्शन घेऊन दिंडी शेगांव कडे प्रस्थान करते दिंडीला शहरात गजानन भक्तां कडून जागोजागी चहा नाष्टा ची व्यवस्था करण्यात येते त्या नंतर दुपारचे जेवण देऊळगाव मही येथे श्री नितीनभाऊ शिंगणे यांच्या कडे असते त्यांनतर दिंडीचा पहिला मुक्काम अंधेरा फाटा येते संदीपभाऊ नागरे व हरिभाऊ सानप यांच्या कडे असतो त्या नंतर दुपारचे जेवण समस्त भालगाव गावकरी मंडळी यांच्या कडून असते
चिखली येथे नलिनी हॉस्पिटल डॉ. भूषण वानखडे यांच्या कडून आरोग्य तपासणी कॅम्प असतो त्या नंतर दुसरा मुक्काम अभिनव कॉलेज चिखली येथे श्री मुरलीधरजी भूतडा याच्या कडे असतो त्या नंतर दुपारचे जेवण पेठ येथे विठ्ठल शेळके याच्या कडे असते त्यानंतर तिसरा मुक्काम सहकार विद्या मंदिर उदयनगर { उंद्री }येथे श्री अतुलजी मोहता याच्या कडे असतो त्या नंतर दुपारचे जेवण गणेशपूर येथे देविदासभाऊ तेटवाल याच्याकडे असते दिंडीचा चौथा मुक्काम माहेश्वरी भवन खामगाव श्री गजानन महाराज भक्त परिवार याच्या कडे असतो त्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता दिंडी शेगाव कडे प्रस्थान करते व 11जानेवारी 2024 गुरुवार ला दुपारी 1 वाजता दिंडी श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे पोहचेते सदर दिंडीचे हे 9 वे वर्ष आहे
या दिंडी सोहळ्या मध्ये ईच्छुक भक्तांनी सहभागी व्हावे असे अव्हान दिंडी प्रमुख सुमेध बोराटे अध्यक्ष राजेशजी भूतडा गजानन मुळे विजय उपाध्ये आसाराम गाडेकर रामेश्वर तिडके व इतर सदस्य तसेच देऊळगाव राजा ते शेगाव पायी दिंडी सोहळा समिती च्या वतीने करण्यात आले आहे