अकोला तालुक्यातील आणि परिसरतील गावातील शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यापासून धान्य दुकानदार धान्य देत नाहीत कारण विचारले असता उडवा उडावीची उत्तरे देतात तसेच तहसील कार्यालय यांच्याकडून धान्य बंद केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हा परिषद सदस्य शिव मोहड ,तालुका प्रमुख नितीन पाटील ताथोड, सर्कल प्रमुख केतन पाटील हागे, सर्कल प्रमुख शुभम गावंडे ,युवा सेना तालुका अमित देशमुख,मयूर धोंडसे,असिफ शेख,अनील ठाकूर,हैदर आली, नासिर शेख,सरोज भाई,तन्वीर, निजम शाह,आदी माजलापूर परिसरातील नागरिकांनी तहसील कार्यालय अकोला येथे आज धडक दिली. तहसीलदार दौऱ्यावर असल्यामुळे पुरवठा अधिकारी पलसपगार साहेबांशी सविस्तर चर्चा करून लवकरच दोषींवर कार्यवाही करून धान्य वितरित करण्याबाबत पुरवठा अधिकारी यांनी जिल्हाप्रमुख यांना आश्वासन दिले.
Users Today : 12