पुणे: बंगालच्या उपगारामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळ सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना देखील सोमवारी बसला. चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे जाणारी येणारी १२ उड्डाणे सोमवारी रद्द करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे जोराचा वारा सुरू आहे. तसेच, दक्षिणेत हवामान खराब झाल्यामुळे चेन्नईसह, हैदराबाद व अजूबाजूच्या विमानतळावरील उड्डाणे रविवारी सकाळपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी पुण्यातून दक्षिणेत जाणारी सहा विमाने रद्द करण्यात आली. तर, चेन्नई, विशाखापट्टणम, हैदराबाद, नागपूर येथून येणारी विमाना रद्द करण्यात आली होती. त्यापैकी चेन्नई येथून सर्वाधिक तीन विमाने रदद् झाली आहेत.
तसेच, पुण्यातून बंगळुरूसाठी जाणारे एक उड्डाण देखील रदद् करण्यात आले आहे. त्यामुळे या शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामाना करावा लागला. अद्याप तरी हवामान खराबच आहे. त्यामुळे मंगळवारी देखील काही विमाने रद्द होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.जाणारी विमाने येणारी विमाने
पुणे-बंगळुरू चेन्नई-पुणे- ३
पुणे-चेन्नई-२ विशाखापट्ट्णम-पुणे,
पुणे विशाखापट्ट्णम नागपूर-पुणे
पुणे हैदराबाद हैदराबाद-पुणे
पुणे नागपूर