नागपूर जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल

Khozmaster
1 Min Read

नागपूर जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल

नागपूर, दि. २२ – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि.२२) इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात २८ अर्ज, सावनेर विधानसभा मतदारसंघात १८ अर्ज, हिंगणा विधानसभा मतदारसंघात २४ अर्ज, उमरेड विधानसभा मतदारसंघात ३५ अर्ज, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात ४१ अर्ज, नागपूर दक्षिण ३८, नागपूर पूर्व विधानसभा ४७, नागपूर मध्य ९९, नागपूर पश्चिम ३३, नागपूर उत्तर ५२, कामठी विधानसभा २९, रामटेक १८ अर्ज असे एकुण बारा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. आज एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असून, ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे.

0 9 4 7 2 0
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *