शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, मुंबईच्या माजी महापौरांना उमेदवारी

Khozmaster
2 Min Read

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव वडाळ्यामधून उमेदवारी दिली आहे. भायखळ्यात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटामध्ये प्रवेश करणारे माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी शिवसेनेकडून याआध ६५ उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात आली होती. तर आता दुसरी यादी समोर आलीये.मुंबईतील तीन ठाण्यामधील दोन जागांवर उमेदवार दिला आहे. काँग्रेससोबत वाटाघाटीवेळी खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. नितेश राणेंविरोधात संदेश पारकर, यामिनी जाधव यांच्याविरूद्ध मनोज जामसूतकर, वडाळ्यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली आहे. शिवडीमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर वि. अजय चौधरी अशी बिग फाईट होणार आहे. बुलढाण्यामधून जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली गेली आहे. काँग्रेसमधून जयश्री शेळके यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. बबनराव घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेना वि. शिवसेना अशी रंगतदार लढत होणार आहे. उदय सामंत वि. ठाकरे गटाचे बाळ माने अशी लढत होणार आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये मुंबईमधील जागा कमी झाल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती समजत आहे.

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा- (अज) राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *