प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शहादा शहरातील मध्यभागी असलेल्या शहादा बस स्थानक आवारात तालुकास्तरीय शहादा शहर असल्या कारणाने या बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते मात्र या बस स्थानक परिसरात पोलिसांचा मोठा अभाव दिसून आलेला आहे,
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात सुंदर व आर्थिक दृष्टी मजबूत असलेला शहादा शहर हे नाव सहज कोणाच्याही तोंडी ऐकण्यात येते या शहादा शहरात मध्यभागी असलेले शहादा बस स्थानक आहे.
या बस स्थानकाच्या उत्तरेस व दक्षिणेस व पश्चिमेस अशा तिन्ही बाजूला मुन्सिपल हायस्कूल, विकास माध्यमिक हायस्कूल, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, या प्रामुख्याने सर्वात मोठ्या शिक्षण संस्था आहेत, तीन-चार हजार मुला मुलींची यात संख्या आहे. जवळपास सर्वच मुली आणि मुले हे शहादा शहरात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येतात, व ह्या मुलांच्या प्रचंड प्रमाणात संध्याकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर बस स्थानक परिसरात अलोट गर्दी पाहण्यास मिळते शिवाय देखील मोठ्या प्रमाणावर येथे असतात, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही वर्षांपूर्वी शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील व बस स्थानक आवारातील किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले होते हे लक्षात घेता शहादा पोलीस प्रशासनामार्फत या बस स्थानक परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते.
मात्र कालांतराने हे पोलीस या बस स्थानकात दिसेना असे झाले, परिणामी सध्या एवढ्या प्रचंड प्रमाणाच्या गर्दीमध्ये काही मोटरसायकल वाले हॉर्न वाजवत बिनधास्तपणे तसेच टवाळकी मुलाचा देखील येथे मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येतो.
शहादा तालुक्यात सुमारे शंभरहून अधिक ग्रामपंचायत गावे व पाढे जोडल्या असल्याकारणाने शिवाय सर्वच शासकीय कार्यालय हे देखील याच परिसरात आहेत त्यामुळे अधिकच मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्ग व शालेय मुलांच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असतो, तसेच बस स्थानकाच्या बाहेरील बाजूस असंख्य वाहनांचा बे शिस्त पणा येथे दिसून आला आहे, बस स्थानक परिसरातून हाकेच्या अंतरावर उपविभागीय तथा दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे, तरीही आज पावत ही समस्या कधी न सुटणारी कोडच आहे यात मात्र शंका नाही,
Users Today : 22