व्हॉईस ऑफ मीडियाच्या नंदुरबार तालुक्याच्या वतीने आमदार ना. विजयकुमार गावित यांना निवेदन.

Khozmaster
2 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार – व्हॉईस ऑफ मीडियाच्या बारामती येथे अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या विविध ठरावांवर शासनाच्या वतीने यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, यासाठी आपल्या स्तरावरून विधानसभेत पत्रकारांच्या वतीने सदरचा मुद्दा उपस्थित करावा तसेच मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या ठरावाबाबत शासन पातळीवर मंजूर करण्याबाबतची विनंती करावी अशी मागणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा आ.डॉ. विजयकुमार गावित यांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या नंदुरबार तालुक्याच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन स्वीकारताना आ.डॉ. गावित यांचे स्वीय सहाय्यक भरत वसईकर उपस्थित होते. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांची देशव्यापी संघटना असून संपूर्ण देशभरात ३७ हजार सदस्य आहेत.पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे. नुकतेच बारामती येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशन पार पडले. यात राज्यभरातून दीड हजार पत्रकार बांधव सहभागी झाले होते. या अधिवेशनात पत्रकारांशी संबंधित विविध १४ ठराव एकमताने पारित करण्यात आले. या ठरावाची समीक्षा करून शासनाच्या वतीने यावर तातडीने निर्णय घेण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य अपेक्षित आहे. यासंदर्भात विधानसभेत पत्रकारांच्या वतीने आपण हा मुद्दा उपस्थित करावा अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे ठराव शासन पातळीवर मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे, निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर , जिल्हा प्रसिद्ध प्रमुख जगदीश ठाकुर तालुकाध्यक्ष वैभव करवंदकर, कार्याध्यक्ष शांताराम पाटील,  तालुका उपाध्यक्ष हिरालाल मराठे,तालुका प्रसिद्ध प्रमुख महादू हिरणवाळे, तालुका सदस्य  प्रवीण चव्हाण यांच्या सह्या आहेत.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *