रेग्युलेटर बसवत असताना अचानक गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतला, घरात आग लागली अन्…

Khozmaster
1 Min Read

परभणी: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना गॅस गळतीमुळे सिलिंडरने अचानक पेट घेतला. लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. एक जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसूर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी तालुक्यातील कानसुर येथील रहिवासी आशाबाई दत्तात्रय गिरी यांच्याकडे इंण्डेन कंपनीचा घरगुती वापराचे गॅस कनेक्शन आहे. सोमवार ४ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरातील स्वयंपाक घरातील सिलेंडर गॅस संपल्यानंतर त्यांनी गावात आलेल्या गॅस डिलिव्हरी बॉयकडून नवीन गॅस सिलेंडर खरेदी केला होता. दरम्यान त्यांचा मुलगा गणेश गिरी हा गॅस सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना सिलेंडरचे झाकण काढताच सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळतीला सुरुवात झाली.प्रसंगावधान राखत घरातील सर्व व्यक्तींना त्यांनी बाहेर जाण्यास सांगितले. परंतु स्वयंपाक घरामध्ये बाजूलाच स्वयंपाक करण्यासाठी घरगुती चुल पेटलेली होती. त्यामुळे गळती झालेल्या गॅसने क्षणार्थात आग पकडली. यावेळी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना गणेश गिरी यांचे पाय भाजल्याने ते जखमी झाले आहेत. दरम्यान सुदैवाने सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी यावेळी लागलेल्या आगीमध्ये स्वयंपाक घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घटनेत एक मोबाईल ही जळून गेला आहे. दुर्घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे गिरी कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *