डिजीटल …
तंत्रज्ञाना अतिरेक
युनोस्को अहवाल
डिझीटल शिक्षणा
उठे गंभीर सवाल
विद्यार्थी भवितव्या
सिग्नल पहा लाल
फाजील लाडातूनि
उधळे नीत गुलाल
बालपणीलहानग्या
मोबाईल तो बहाल
आयुष्य भविष्य ते
स्वता करतो बेहाल
पिढी स्मार्ट आजची
समर्थानार्थ धरे ढाल
सात पटीने वाढली
सेलफोन उलाढाल
भावनिक स्थैर्यनाही
ना शरीरा हालचाल
विचार शक्ती खुंटली
डोळ्यांचे होती हाल
एकलकोंडा स्वभाव
चिडचिडे होवूनजाल
रेडिमेड मिळे सगळे
पारतंत्र्यी माया जाल
तंत्रज्ञान आवश्यकचं
प्रगतीची बदले चाल
अतिवापरावरअंकुश
रे अरिष्टातून वाचाल