प्रविण चव्हाणनंदुरबार -: मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या.
तसेच शेतकरी बांधव स्वत: देखील त्यांना भेटत होते. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते.
पोलीसांसमोर देखील घडलेले गुन्हे उघडकीस चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान होते.
त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत गुन्हे बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेल मधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.
दिनांक 08 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की, मागील काही दिवसात शहादा व सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत झालेला कापुस, सोयाबीन, तांदुळ चोरी करणारे आरोपी हे बोरद ता.तळोदा जि. नंदुरबार येथील आहेत.
तसेच चोरी केलेला कापुस, सोयाबीन व तांदुळ संशयीत आरोपीतांनी त्यांच्यातील एका साथीदाराच्या घराच्या मागे पोत्यांमध्ये लपवून ठेवलेले असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावात जावून संशयीत आरोपीतांची माहिती काढून. दिपक सतीलाल पिंपळे ( 22) यास ताब्यात घेवून चोरी केलेला कापुस, सोयाबीन व तांदुळ चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची चोरी त्याचे बोरद गावातीलच त्याचे साथीदार अशोक पवार, शिराफ ठाकरे व नवनाथ चव्हाण यांचे मदतीने केली असल्याबाबत सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक भरत पवार (27) शिराख पदम ठाकरे (24) नवनाथ रमण चव्हाण (22) सर्व रा. बोरद ता.तळोदा जि. नंदुरबार यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांना कापुस, सोयाबीन व तांदुळ बाबत विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे देवू लागले म्हणून पथकाने संशयीत इसमांना विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी शहादा व सारंगखेडा येथून मागील काही दिवसांपासून कापुस, सोयाबीन व तांदुळ चोरी केल्याबाबत सविस्तर माहिती सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून 60 हजार रुपये किमतीचे 12 क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.265/2023 भा.द.वि. कलम 379,457 प्रमाणे दाखल आहे.
तसेच 95 हजार रुपये किमतीचा 19 क्विंटल कापुस व गुन्हा करते वेळी वापरण्यात आलेले 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
त्याबाबत शहादा पोलीस ठाणे गु.र.नं. 688/2023 भा.द.वि. कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच 540/- रुपये किमतीचा 45 किलो तांदुळ जप्त करण्यात आलेला आहे. त्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बामखेडा जिल्हा परिषद शाळेतून 4 ते 5 महिन्यापूर्वी तांदुळ, तुरदाळ, तेल व इतर वस्तु चोरी झाल्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाणे गु.र.नं. 148/2023 व सारंगखेडा पोलीस ठाणे गु.र.नं. 160/2023 भा.द.वि. कलम 454,457,380 प्रमाणे 2 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले. दिपक सतीलाल पिंपळे (22) अशोक भरत पवार (27) शिराख पदम ठाकरे (24)
नवनाथ रमण चव्हाण (22) सर्व रा. बोरद ता.तळोदा जि. नंदुरबार यांचे ताब्यातून एकूण 2 लाख 80 हजार 540/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 04 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
तसेच आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे , पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस नाईक बापु बागुल, विशाल नागरे, सुनिल पाडवी, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, यशोदिप ओगले यांनी केली आहे.
Users Today : 22