वाशिम / प्रदिप पट्टेबहादुर.वाशिम ; आधार निवासी मतिमंद विद्यालय वाळकी रोड येथे ८ डिसेंबर जागतीक मतिमंद दीन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून निर्मल मुकुंद माधव फाउंडेशन याच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्याना ब्लॅंकेट व खाऊचे वाटप करण्यात आले. तर यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन वाढवण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यामध्ये लांब उडी, धावणे,बादलीत बॉल टाकने इत्यादी खेळांचा समावेश होता. या खेळात प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्याना बक्षिस देण्यात आले. लांब उडी मध्ये सतीष वाकळे प्रथम, दिपांशु गंगावणे द्वितीय तर संकेत पहारे तृतीय क्रमांक घेतला, धवण्या मध्ये शंकर गाडेकर प्रथम,आदित्य खंडारे द्वितीय, व शिवम शिंदे तृतीय क्रमांक घेतला बादलीत बॉल टाकने यात ओम दांदडे प्रथम,गणेश मगर द्वितीय तर लखन श्रीखंडे हा तृतीय क्रमांकावर होता या कार्यक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पुंड, मुकुल माधव फाउंडेशन चे राम राठी, गवई सर तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .त्यानंतर वाशिम तेथे सुरू असलेल्या बॉम्बे सर्कस मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यानी सर्कस पाहण्याचा आनंद घेतला या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनचुंबी होता. यावेळी उपस्थिती रामेश्वर नव्हाळे ,संदीप पुंड,योगेश सवसुंदर,रवी हरिमकर
,सतीष नव्हाळेरजत बागडे,कृष्णा सावसुंदर,बाली तायडे,चैताली गोरे
सीमा वाडेकर,आरती पोपळघट तसेच सर्व विध्यार्थी यांची उपस्थिती होती.
Users Today : 14