Mumbai Weather Update : मुंबई होणार Cool, रात्रीचा पारा घसरणार; या तारखेपासून घ्या गुलाबी थंडीची मजा…

Khozmaster
2 Min Read

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं वादळ आता थांबलं असून हलक्या थंडीला आता सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. त्यामुळे रात्री मुंबईकरांना थंडीची मजा घेता येणार आहे.

खरंतर, मुंबईकर थंडीची वाट पाहत असले तरी दमट उष्माचाही रोज सामना करावा लागतो. उपनगरातील किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहिलं. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार १२, १३ आणि १४ डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तर १५ आणि १६ डिसेंबरला तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. हवामान खात्याचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं की, उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होईल, त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होईल.

३० अंशांच्या पुढे असेल दिवसाचं तापमान

मुंबईकरांना रात्री उष्णतेपासून दिलासा मिळेल. मात्र, दिवसा तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, आर्द्रता ६५ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मुंबईकरांना आर्द्रतेपासून दिलासा मिळेल. मात्र, रात्रीचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

रविवारी तापमान

सांताक्रूझ
कमाल – 33.5 अंश
किमान – 21.3 अंश
आर्द्रता पातळी – 56 टक्के

कुलाबा
कमाल – 32.4 अंश
किमान – 22.8 अंश

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *