नंदुरबारच्या श्री काशिनाथ बाबा मंदीर यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन.

Khozmaster
3 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटी जवळील टेकडीवर असलेल्या श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा समितीतर्फे मंगळवार दि. 12 डिसेंबर रोजी भव्य खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबारसह धुळे, जळगाव, मालेगाव, अमळनेर, भुसावळ, आणि मध्य प्रदेश राज्यातील नामांकित मल्ल या कुस्ती स्पर्धांना हजेरी लावणार आहेत.
धुळे रस्त्यावरील वाघेश्वरी माता मंदिरा पासून 200 मीटर अंतरावर असलेल्या ज्ञानदीप सोसायटी टेकडीवरील श्री काशिनाथ बाबा मंदिरावर तब्बल 51वर्षानंतर गतवर्षी नंदुरबार नगर पालिकेतर्फे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून भव्य  हायमस्ट दिवा लावल्यामुळे मंदिर परिसर  प्रकाशमय झाला आहे. गवळी समाजासह असंख्य भाविकांना नवसाला पावणाऱ्या श्री काशिनाथ बाबा मंदिराची स्थापना कार्तिक वद्य अमावस्या दि. 12 डिसेंबर 1971 रोजी करण्यात आली.या मंदिरात महादेवाची पिंड, नंदी तसेच हनुमानाची मूर्ती आहे.स्थापनेपासून दरवर्षी श्री काशिनाथ बाबा मंदिराचा यात्रोत्सव होत असत.नंदुरबार शहरात सर्वप्रथम खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांचे आयोजन श्री काशिनाथ बाबा सेवा समितीतर्फेच करण्यात आले. याशिवाय रेडयांची झुंज देखील  प्रमुख आकर्षण होते. अस्सल तांबड्या मातीतील कुस्तीची परंपरा टिकवून ठेवणाऱ्या दिवंगत मल्लांच्या स्मृति कायम ठेवून आठवणींना उजाळा देण्यासाठी पुनश्च खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांचे  यावर्षी आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम सन 1995 पर्यंत अखंडपणे सुरू होते.मात्र त्यानंतर कुस्त्यांचे फड बंद झाले. विनामूल्य असलेल्या या कुस्ती स्पर्धांचे प्रमुख आकर्षण म्हणजे वीस वर्षाच्या तरुणांपासून 70 वर्षाच्या ज्येष्ठ पैलवानांच्या कुस्ती पाहण्याची  यंदा सुवर्णसंधी आहे. धुळे रस्त्यावरील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह शेजारील घोडा मैदान येथे दि.12 डिसेंबर रोजी  दुपारी दोन ते पाच या वेळेत कुस्ती स्पर्धा होतील.
    कुस्ती लढणाऱ्या विजेत्या पैलवानांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहेत.अशी माहिती श्री काशिनाथ बाबा सेवा समितीचे समन्वयक तथा शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे आणि नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव जय मराठे यांनी दिली. श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा समिती, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ, नंदुरबार तसेच राष्ट्रीय तालीम संघ नंदुरबार यांच्या सहकार्याने खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
चौकट
श्री काशिनाथ बाबा मंदिर स्थापनेला यावर्षी 52 वर्ष पूर्ण होत आहेत.विशेष योगायोग म्हणजे यावर्षी मंगळवार दि. 12 डिसेंबर 2023 रोजी कार्तिक वद्य अमावस्या असून मंदिराचा 52 वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. तब्बल 28 वर्षानंतर श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा सेवा समितीतर्फे यंदा खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धा होत आहेत.
चौकट
शालेय विद्यार्थिनी आणि जेष्ठ मल्लांच्या स्वतंत्र कुस्ती लक्षवेधी ठरणार…
नंदुरबार येथे श्री काशिनाथ बाबा मंदीर सेवा समितीतर्फे यात्रोत्सवानिमित्तआयोजित खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांमध्ये मध्यप्रदेश राज्यातील मुलींच्या कुस्तीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय नंदुरबार व दोंडाईचा येथील 70 वर्षीय जेष्ठ मल्ल यांची कुस्ती लावण्यात येणार आहे. शेवटची कुस्ती चाळीसगाव आणि भुसावळ येथील
तरुण पैलवानांची  होईल.दुपारी एक वाजता कुस्त्यांची नोंदणीसाठी पैलवानांनी हजर राहणे आवश्यक आहे.असे संयोजकांतर्फे  आवाहन   करण्यात आले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *