कट्टा ..

Khozmaster
1 Min Read
कट्टा ..
खेळा  बद्दल चर्चा
रंगतो  गप्पा  कट्टा
व्यक्त होतो  संशय
लागला का रे सट्टा
हरला का अवचित
संघ असा धट्टकट्टा
अकले प्रमाणे तर्क
चालतो  तोंडा पट्टा
जयघोषाला  तयार
करु  मस्त नट्टापट्टा
मिळाला नाही जय
आनंद सगळा खट्टा
साजरे कराया जय
तयार  बांधूनि फेटा
मौसम झालापलटा
निकाल होई उलटा
चुकीचे घडले  काय
कळत  नसते  माठा
गडबड केली नक्की
अपप्रचार का खोटा
कारणे शोधणेसाठी
लाखो  हजारो वाटा
विचारतातनिलाजरे
तुमचा केवढा  वाटा
मन  करता विशाल
पराजय  वाटे छोटा
मनोबल  घट्ट करता
संसार नव्याने थाटा
0 9 4 7 7 3
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *