कात्रजच्या प्रश्नांसाठी उपोषण

Khozmaster
1 Min Read
महापालिका प्रशासनाविरोधात असंतोष; नमेश बाबर आक्रमक
कात्रजच्या विविध प्रश्नांसाठी वर्षापूर्वी केलेल्या दीड उपोषणाच्या वेळी दिलेल्या लेखी आश्वासनांचा महापालिकेला विसर पडला. नागरी प्रश्न व विकास प्रकल्पाबाबत दोन खासदार व तीन आमदारांचे दुर्लक्ष होत आहे, याच्या निषेधार्थ नागरिकांच्या वतीने कात्रज विकास आघाडीच्या नमेश बाबर यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगरले आहे.
शिरूर मतदारसंघासाठी खासदारांनी ३० हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी एक रुपयादेखील कात्रजच्या वाट्याला नाही, या दुजाभावाचे दुः ख बाटते. अधिवेशन काळात नागरी प्रश्न प्राधान्याने सोडवले जातात, कात्रजच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याची जबाबदारी आमदारांची असून, त्यांनी ती पूर्ण करावी, अशी मागणी बाबर यांनी केली.
कात्रज डेअरी ते मांगडेवाडी उड्डाणपूल, राजस चौक ते गोकुळनगर उड्डाणपूल बांधणे
कात्रजसाठी पाच वर्षांत दोन खासदार यांनी निधी दिला नाही. दीड वर्षापूर्वी महापालिकेने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे महापालिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. गुरुवारपर्यंत (दि. १४) मागण्या मान्य न झाल्यास कात्रजकरांच्या तीव्र असंतोषाचा
प्रशासनाला सामना करावा लागेल
कात्रजचा एकत्रित विकास आराखडा तयार करणे, समाविष्ठ गावांतील अन्यायकारक तीनपट कर कमी करणे बाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले आहे
या वेळी माजी नगरसेविका अमृता बाबर, दीपक गुजर, अनिल कोंढरे, विक्रम भिलारे, गोरख मांगडे आदींसह उपोषणाला समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 3 8 5 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *