Nagpur News: आजवर आठ वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता तर राजकीय पक्ष मराठ्यांना किती वेळा मुख्यमंत्री बनविनार अशी हास्यास्पद मागणी करतात. मराठा आरक्षणाचा हा सगळा संघर्ष हा ओबीसी मुख्यमंत्री संपवेल का?मराठेच आपल्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत तर ओबीसी मुख्यमंत्री हे करू शकेल का? असा उपरोधिक सवाल अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना कडू असेही म्हणाले की आता आंदोलने ही शक्तीने नव्हे तर युक्तीने आणि डावपेचांनी लढली जातात. या डावपेचांमध्ये कोण कुणाच्या बाजूने हे चेहरे बघितले तरी लक्षात येते, असेही कडू म्हणाले.हक्काची लढाई आता कमकुवत झाली आहे आणि जात-धर्माची लढाई जास्त मजबूत झाली आहे. मजुरांच्या मजुरीची, शेतकऱ्यांच्या हमीभावाची, कामगारांची लढाई न होता जातीसाठीच्या लढाईलाच जास्त जोर चढला आहे. राजकारण्यांनी जातीची लढाईपोटी हक्काच्या लढाईकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
Users Today : 19