Nagpur News: मराठा आरक्षणावरून या सरकारने रस्त्यावरचे भांडण चव्हाट्यावर आणले आहे. मंत्रालयात बसून ओबीसी आणि मराठ्या नेत्यांना सोबत घेत हा प्रश्न सोडवला असता. परंतु सरकारला हे करायचे नव्हते.
मराठा धनगर आणि वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर दाखवून प्रत्यक्षात काही करायचे नाही, असा आरोप नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज जसे सुरतला गेले होते तसे आम्हीही सुरतला गेलो होतो.
यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज सुरतला लुटलेला खजिना परत आणण्यासाठी गेले होते. परंतु हे गुलामगिरीसाठी गेले. त्यांना कस्टडीत ठेवण्यात आले होते. त्यातला एका नेत्याला हलताना डोलताना लोकांनी बघितले.
अजित पवारांनी पीएचडी संदर्भात केलेले वक्तव्य हे शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधात भाजप सरकार आहे हे दर्शविणारे आहे आणि हा माजही त्यांच्या वर्तनातून आणि बोलण्यातून दिसतो, असेही पटोले म्हणाले.
केंद्र सरकार सर्वच सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढविला आहे. सगळ्या गोष्टी आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे हे प्रयत्न योग्य नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज- थोरात
अधिवेशनाचे पाच दिवस लोटले आहेत. पण, सरकारने शेतकऱ्.ांच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. अतिवृष्टीमुळे लहान कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान वर्षभरही भरून निघू शकणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मदत नको तर भरीव मदतीची गरज आहे,
अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. राज्यसभेत निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबतचे विधेयक मंजूर झाले आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, सरकार सर्वच सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढवीत आहे. त्याचे परिणाम चुकीचे आहेत.
Users Today : 54