स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विज्ञान भारती नागपूर व आदर्श विद्यालय चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या स्पेस ऑन विल्स अर्थात फिरत्या बसमधून अंतराळ प्रदर्शनीचे आयोजन बुधवार दिनांक 13 12 2023 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या दरम्यान केले होते भारतीय अंतराळ संस्थेची आजवरची वाटचाल व अंतराळ विज्ञानाची माहिती सर्वसामान्य नागरिकासह विद्यार्थ्यांना व्हावी हा या प्रदर्शनीचा मुख्य हेतू आहे याद्वारे चिखली नगरातील व तालुक्यातील विविध शाळांनी शाळेमध्ये आयोजित केलेल्या अंतरिक्ष महायात्रा स्पेस ऑन विल्स या प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी विज्ञान व अंतराळ याबाबतीत त्यांच्या मनात असलेले कुतूहल आणि शंका यांचे निरसन होण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही प्रदर्शनी उपयोगी ठरली या प्रदर्शनीचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा दिनांक १२ डिसेंबर 2023 रोज मंगळवारला गट अ वर्ग 06ते 08 व गट ब वर्ग 9 ते 12 स्पर्धेचा विषय भारतीय अवकाश मिशन व आंतरराष्ट्रीय अवकाश मिशन हा ठेवण्यात आला होता त्यानंतर विद्यालयामध्ये पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या पोस्टर्स स्पर्धेचे विषय उपग्रह प्रक्षेपण ,भारतीय अवकाश संशोधक ठेवण्यात आले होते सोबतच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधन याविषयी जागरूकता आकर्षण निर्माण व्हावे या हेतूने प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा दिनांक 13 डिसेंबर रोज बुधवारला ठेवण्यात आली होती स्पर्धेचे विषय भारतीय अवकाश संशोधक याप्रमाणे ठेवण्यात आलेले होते. सदर प्रदर्शनीचे उद्घाटन आदर्श विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानजी शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री प्रमोद जी ठोंबरे सर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख श्री देवकर साहेब, श्री केवट साहेब ,नगरपरिषद प्रशासन अधिकारी श्री शकील साहेब, विवेकानंद विद्यालय एकलारा चे प्राचार्य माननीय ललितकुमार बारापात्रे सिद्धेश्वर विद्यालय कोलारा प्राचार्य माननीय श्री अनंतराव ठेंग सर तसेच पर्यवेक्षक श्री कुटे सर व श्री नालींदे सर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ ज्योती जपे यांनी तर सूत्रसंचालन सौ वैशाली सुरडकर यांनी केले व आभार प्रदर्शन वर्ग 7ग मधील विद्यार्थिनी कु.वृषाली संदीप पराड व कु. समृद्धी नंदकिशोर मिरेकर यांनी केले.सदर प्रदर्शनीला शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री रामकृष्ण दादा शेटे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री प्रेमराजजी भाला, उपशिक्षणाधिकारी माननीय श्री अनिलजी आकाळ साहेब,पंचायत समिती चिखली चे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री समाधान खेडेकर साहेब, माननीय श्री केवट साहेब,माननीय श्री देवकर साहेब यांनी भेट देऊन विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा उत्साह वाढविला सदर स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेतला सदर प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ सफरीचा आनंद घेता आला सदर कार्यक्रमाचा समारोप बक्षीस वितरण सोहळा आदर्श विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानजी शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री प्रमोदजी ठोंबरे सर पर्यवेक्षक माननीय श्री रामेश्वरजी कुटे सर पर्यवेक्षक श्री गणेशजी नालींदे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री श्रीपादजी दंडे सर तसेच सर्व विज्ञान विषयाचे शिक्षक उपस्थित होते. तसेच फिरत्या अंतराळ बस सोबत आलेले सुजित चव्हाण उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा माननीय प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तो खालील प्रमाणे प्राथमिक गट रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक अक्षरा सुजित राठोड (आदर्श विद्यालय चिखली) द्वितीय क्रमांक श्रुती वाघ आदर्श विद्यालय, तृतीय क्रमांक भूषण रमेश परिहार (आदर्श ज्ञानपीठ चिखली) गट वर्ग 08ते 10 प्रथम क्रमांक कु. वेदिका संजय धनवे, द्वितीय क्रमांक ओम भरत परसणे, तृतीय क्रमांक कु. प्राची श्रीराम मिसाळ
*पोस्टर्स स्पर्धा* प्रथम क्रमांक कु. श्रावणी भुजंगराव शेळके (आदर्श विद्यालय चिखली) द्वितीय क्रमांक क्रीश महादेव सासवटे (आदर्श विद्यालय चिखली)तृतीय क्रमांक आदित्य मुकेश भवर (आदर्श विद्यालय चिखली) वर्ग 8 ते 10 प्रथम क्रमांक कु. श्रद्धा विजय वाघमारे, द्वितीय क्रमांक प्रसाद अरुण भवर ,तृतीय क्रमांक आदित्य अरुण आराख
प्रश्नमंजुषास्पर्धा प्रथम क्रमांक श्रेयस शंकर उंबरकर, (आदर्श विद्यालय चिखली) द्वितीय क्रमांक ओम सोपान कायंदे(आदर्श विद्यालय चिखली) तृतीय क्रमांक स्वराज्य विनोद जाधव (आदर्श विद्यालय चिखली) गट वर्ग आठ ते दहा प्रथम क्रमांक अर्जुन अशोक साखरे (आदर्श विद्यालय चिखली) द्वितीय क्रमांक शेख वारीस शेख शकील (नर्मदा विद्यालय मंगरूळ इसरुल) तृतीय क्रमांक यशोधन संतोष ढोरे (विवेकानंद विद्यालय एकलारा) विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री प्रमोदजी ठोंबरे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे आणि संपूर्ण जगभर आपल्या देशाचा नावलौकिक वाढत असताना आपल्याला दिसून येत आहे आज आपले जीवन अत्यंत सुखर हे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळेच झाला आहे आपल्या देशानेही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे का सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये विकास साधला आहे. जगामध्ये जे काही नवीन नवीन शोध लागले त्या सर्व शोधांचा परिचय आपल्याला आपल्या इतिहासामधून धर्मग्रंथांमधून झालेला दिसून येतो परंतु आपल्यावर झालेले अनेक आक्रमण आणि आपण पारतंत्र्यात गेल्यामुळे आपण आपला वैभवशाली संस्कृति , वैभवशाली ज्ञान याचा विसर आपल्याला पडलेला दिसून येतो. परंतु आपण पुन्हा एकदा विज्ञान या विषयाचे कास धरून त्याचा सखोल अभ्यास करणे आपल्या देशाला पुन्हा आपले गतवैभव मिळवून द्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले सोबतच मान्य ठोंबरे सर यांनी इस्रो या संघटनेचे माहिती आणि कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. काही काळापूर्वी वैज्ञानिक शोध संशोधन उपग्रह प्रक्षेपण यासारख्या विविध गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून असलेला आपला देश आज वैज्ञानिक दृष्ट्या पूर्णपणे सक्षम झाल्याचे आपल्याला दिसून येते क्रमाचे अध्यक्ष माननीय श्री समाधानजी शेळके सर यांनी आपल्या मनोगतामधून आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा वैज्ञानिक नाही ज्या संस्थेने पूर्ण केल्या ती संस्था म्हणजे इस्रो आणि आपल्याला सुद्धा भारतीय नागरिक म्हणून त्या सर्व गोष्टींचा सार्थ अभिमान आहे. इसरो या संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा जो एकूण प्रवास या संस्थेचा आहे त्याची संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये आपल्याला या प्रदर्शनेच्या माध्यमातून समजून घ्यायला मिळाली सोबतच आपल्या देशामध्ये घडून गेलेले विविध वैज्ञानिक संशोधक यांचीही माहिती आपल्याला या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजून घ्यायला मदत झाली. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आदर्श विद्यालय ही प्रदर्शनी आपल्या विद्यालयांमध्ये आयोजित केले असे सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी आजची ही प्रदर्शनी पाहिली असून आज आपल्याला जे ज्ञान प्राप्त झाला आहे त्याचा उपयोग आपण आपल्या भावी आयुष्यासाठी करावा असे आवाहन माननीय प्राचार्य यांनी आपल्या समारोपिय भाषणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श विद्यालयाचे शिक्षक माननीय श्री विकास जी जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन माननीय श्री प्रदीप जी हाके सर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू भगिनी यांनी मेहनत घेतली सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी बंधू-भगिनी उपस्थित होतेकार्यक्रम यशस्वीतेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन जिल्हा समन्वयक सौ स्नेहल तायडे(राखोंडे)मॅडम यांचे लाभले..
आदर्श विद्यालय चिखली येथे स्पेस ओन विल्स अंतराळ प्रदर्शनीचे आयोजन
Leave a comment