डीपफेक’ हा चिंता वाढवणारा विषय आहे. यामुळे कोणाचीही बदनामी सहज करता येऊ शकते, त्यातून लोकांमध्ये गैरसमजही पसरु शकतात. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे.
केंद्रस्तरावर कायदा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देण्याबाबतच्या नाशिक येथील घटनेची लक्षवेधी सूचनेद्वारे विलास पोतनीस यांनी उपस्थित केला होता.फडणवीस म्हणाले, सरकार ‘डीपफेक’ मुद्द्यावर गंभीर आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाच्या विश्वस्तांकडून महिलेने खंडणीच्या रकमेची मागणी केली होती. सदर आरोपीकडून जप्त केलेले व्हिडिओ आणि सापडलेल्या पेनड्राईव्ह सत्यता तपासण्यासाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविली आहे असे फडणवीस म्हणाले.
Users Today : 50