शरद’च्या चार प्रकल्पांची ‘हॅकथॉन’ साठी निवड

Khozmaster
2 Min Read

‘शरद’च्या चार प्रकल्पांची ‘हॅकथॉन’साठी निवड
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय ः देशातील ४७ शहरांत स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १३ ः स्मार्ट इंडिया हॅकथॉन-२०२३ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील चार प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकथॉन या अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील चार प्रकल्प निवडलेले शरद इंजिनिअरिंग एकमेव कॉलेज आहे. स्पर्धा देशभरातील ४७ शहरांत १९ ते २३ डिसेंबरदरम्यान होणार आहे.
भारत सरकार शिक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांनी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. याअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांनी हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे २३४ समस्यांचे उपाययोजन (प्रॉब्‍लेम स्टेटमेंट) मागविले होते. यामध्ये शरद इंजिनिअरिंगचे सॉफ्टवेअरचे तीन व हार्डवेअरचा एक प्रकल्प निवडला गेला आहे.
स्पर्धेसाठी प्रा. डॉ. शशीधर गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज लाडंगे, नेहा हलवाई, शार्दुल कुलकर्णी, सम्मेद सावंत, रौनक माणकापुरे, श्रेयस महालिंगपूरे हे छत्तीसगड येथे जाणार आहेत. प्रा. आशिष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अपर्णा शिंदे, संदेश देसाई, सचिन वाघ, ओंकार चौगुले, श्रृती व्हनवाडे, प्रभात हिरेमठ हे म्हैसूरला जाणार आहेत.
प्रा. वर्षा जुजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिती जाधव, जान्हवी सुतार, गौरी पोवार, महमंदसलिक जमादार, श्रेयश कांबळे, धनेश पारीक हे हैद्राबाद येथे जाणार आहेत. तसेच प्रा. ए. एस. एन. हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व जोशी, हर्षवर्धन जाधव, रोहन ठोमके, वैभव चौगुले, धनश्री कोरे, अरविंद प्रजापती हे ग्रेटर नोएडा येथे स्पर्धेसाठी जाणार आहेत. एस.आय.एच. समन्वयक प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *