व्यंकटराव हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

Khozmaster
3 Min Read

इचलकरंजी : व्यंकटराव हायस्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
व्यंकटराव हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
इचलकरंजी : व्यंकटराव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शन घेतले. प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्याध्यापक ए. ए. खोत यांनी केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या दैनंदिन जीवनातील उपयोगी ठरणारी पर्यावरणपूरक अशी ४५ उपकरणे तयार केली. उपकरणांचे परीक्षण एस. बी. व्हनबट्टे, आर. एस. नोरजे यांनी केले. आयोजन विज्ञान प्रमुख जे. ए. कोळी, प्रयोगशाळा सहायक गौतम कांबळे यांनी केले. स्पर्धेत अनुक्रमे मोठ्या गटात प्रथमेश पाटील, श्‍लोक पांगिरे (फरशी वाहक उपकरण), योगेश काजवे (अति संरक्षक गजर), संयम निर्मळ, प्रेम गवळी (हायड्रोलिक जेसीबी), अथर्व बंडगर, गौरव भाकरे (अग्नि गजर), लहान गटात समर्थ कसलकर (वातानुकूलित विद्युत उपकरण), आराध्या सुतार, भगिरथ आलोने (बहुउद्देशीय यंत्र), वाहीद अत्तार (डागणी मशिन), व्यंकटेश महिंद, तनीष हेरवाडे (तुरटीचा गणपती) यांनी यश मिळवले. मुख्याध्यापिका ए. एम. कांबळे, पर्यवेक्षक एम. एस. खराडे आदी उपस्थित होते.
———
ich132.jpg
50920
इचलकरंजी : येथील गंगामाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.
‘गंगामाई’च्या तीन खेळाडूंची निवड
इचलकरंजी : महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १६ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा परभणी येथे होणार आहेत. स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. समीक्षा मिठारी, रोजा कलावंत, श्रावणी रवंदे यांची निवड झाली आहे. खेळाडूंचे ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा, कृष्णा बोहरा यांच्याहस्ते सत्कार केला. क्रीडा विभागप्रमुख प्रा. शेखर शहा, क्रीडा शिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर आदींचे मार्गदर्शन लाभले.
———
माधव विद्यामंदिरात क्रीडा महोत्सव
इचलकरंजी : माधव विद्या मंदिरात क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. क्रीडा शिक्षक सुभाष माने, अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यामध्ये विशेष खेळ ओळखून त्यादृष्टीने पैलू पाडून मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे प्रमुख पाहुणे श्री. माने यांनी सांगितले. क्रीडा शपथ घेऊन मशाल फेरी काढली. स्वागत मुख्याध्यापिका स्वाती शिंदे यांनी केले. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मदन लोखंडे, पंकज मेहता उपस्थित होते. उपमुख्याध्यापक किरण बन्ने, क्रीडा प्रमुख श्री. बरागडे, छाया सिंहासने, तृप्ती उमराणी आदी उपस्थित होते.
———
भारती विद्यामंदिरात क्रीडा महोत्सव
इचलकरंजी : भारती प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे डॉ. अनिल जाधव यांच्याहस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन केले. मुख्याध्यापक शिवाजी पाटील, अशेाक निंबाळकर यांनी क्रीडा स्पर्धांचे महत्व सांगितले. सार्थक काटे याने क्रीडाशपथ दिली. सूत्रसंचालन अर्चना इंगळे यांनी केले. आभार वर्षा रोकडे यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ तेलनाडे, राजकुमार बेडक्याळे, सचिन पाटील, बालवाडी विभागप्रमुख सुचेता चौगुले आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *