पुणे – पेठांमधील जुन्या वाड्यांना झोपडपट्टी असल्याचे भासवून झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) राबविण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदार सुनील टिंगरे यांनी केली.

यामध्ये महापालिकेची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे अशी तक्रार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी एसआरएच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून ज्यांच्या ना कामांचा प्रस्ताव मान्य केलेला नाही अशा प्रकरणांना स्थगिती द्यावी अशी सूचना केली आहे. तसेच तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित केली आहे.
याप्रकरणात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे, आमदार टिंगरे यांनी विधानसभेत प्वाइंट ऑफ इनफॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. शहरातील वाड्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे, पण बांधकाम व्यावसायिकाने महापालिका व एसआरएच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून वाडे हे झोपडपट्टी तर भाडेकरू हे झोपडपट्टीधारक आहेत असे भासवून मान्यता घेतात. त्यातून टीडीआर निर्माण होताना मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळे याची चौकशी करून अधिकाऱ्यांवर करावी, अशी मागणी केली.
Users Today : 23WhatsApp us
Sign in to your account