परभणी: लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. युवती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच युवतीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत युवतीच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात सोमवार ११ डिसेंबर रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडीत युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोशल मिडीयाद्वारे तिची एप्रिल २०२२ मध्ये नांदेड येथील सय्यद जमीर हुसेन सदरुन इस्लाम या युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर युवक तरुणीच्या घरी पूर्णेला आला. या दरम्यान युवकांनी तरुणीला तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगितले. त्यानंतर नांदेड येथे बोलावून घेतले.तरुणीच्या इच्छेविरुध्द लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने तरुणीवर पूर्णा तसेच आदी ठिकाणी बळजबरीने संबध ठेवले. या दरम्यान पिडीत तरुणी गर्भवती राहिली. या विषयी तरुणाला सांगितल्यानंतर त्याने पिडीतेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. आरोपीने तीन वेळा तरुणीच्या इच्छेविरुध्द गर्भपात केला. लग्नाविषयी विचारणा केली असता टाळाटाळ केली. अखेर पीडितेने पूर्णा पोलीस ठाणे गाठत जमीर हुसेन सदरुन इस्लाम याच्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोउपनि राखोंडे तपास करत आहेत.
Users Today : 18