परभणी : परभणीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, मेव्हणा, मेव्हणी, पत्नीवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश बबनराव बुधवंत (वय ३०) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत नर्मदाबाई बुधवंत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीचा मुलगा रमेश याने ऑटो घेण्यासाठी सासू आसराबाई फड यांच्याकडून रक्कम घेतली होती. ही रक्कम परतही दिली. त्यानंतरही रकमेसाठी रमेशला त्रास दिला जात होता.हा त्रास रमेश सहन करू शकला नाही वेळोवेळी बायको, मेव्हणी आणि सासूकडून पैशाची मागणी केली जात होती. याच त्रासाला कंटाळून रमेशने घरासमोरील बदामाच्या झाडाला साडीची दोरी करून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आसराबाई फड, दशरथ फड, गोगी कोंडाबाई, सरस्वती बुधवंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पो.नि. चितांबर कामठेवाड, स.पो.नि. रविंद्र सांगळे यांनी भेट देऊन पाहणी केली.