मार्गशीर्षमुळे व्रताच्या साहित्याला मागणी

Khozmaster
4 Min Read

इचलकरंजी : १) हंगामी देशी गाजर, हिरव्या वाटाण्याच्या शेंगाची आवक कमी झाली आहे.
07730
२) मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमुळे फळबाजारात पाच फळांना मागणी होती.
मार्गशीर्षमुळे व्रताच्या साहित्याला मागणी
उपवास, पुजेसाठी फळांमुळे फळबाजार तेजीत ः भाज्यांच्या दरात वाढ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.१४ : मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार असल्याने व्रतासाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी होते. आकर्षक देवीचे मुकूट, नारळ, हार, आंब्याची पाने, पुजेचे साहित्य, फुले खरेदीसाठी महिलांचीही गर्दी होताना दिसली. मुख्य मार्गावर खरेदीची वर्दळ राहिली. तसेच उपवास आणि पूजेसाठी फळे यामुळे फळबाजारालाही तेजी आली आहे. केळीसह पाच फळांना अधिक मागणी होती. मागणी वाढल्याने पुढील महिनाभर फळांचे दर चढेच राहतील.
भाजीपाला बाजारात वाढत्या थंडीने महागाई ओढवत आहे. पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. मेथी, कोथिंबीरच्या पेंढीचे दर अचानक २० रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. बाजार समितीत अचानक आवक खालावली आहे. लसणाचे भाव अद्याप तिखट असून शेवग्याचा दरही लांबलचकच आहे. टोमॅटो, कांद्याच्या दरात उतरण सुरू आहे. तर दुसरीकडे दोडका, वांगी, मिरची, बीन्सच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. भेंडी, गवारीचे दर आवाक्याबाहेर जात आहेत. हंगामी वाटाण्याच्या शेंगांची आवक फारशी नसली तरी दर कमी झाले आहेत. फळबाजारात संत्रीची आवक पुन्हा जोमात आहे. फुलबाजारात झेंडूच्या फुलांना मागणी जास्त आहे.
प्रति किलो रूपये भाजीपाला ः टोमॅटो- २५ ते ३०, दोडका- ६० ते ८०, वांगी – ६० ते ८०, कारली- ३० ते ४०, ढोबळी मिरची- ३० ते ४०, मिरची – ४० ते ५०, फ्लॉवर – १५ ते २०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा -३५ ते ४५, लसूण- ३२० ते ३५०, आले- १०० ते १२०, लिंबू- १०० ते ३०० शेकडा, गाजर -५० ते ६०, बीन्स- ६० ते ८०, वरणा शेंगा – ५० ते ६०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, दुधी – २० ते ३०, हिरवा वाटाणा – ६० ते ७०, पालेभाज्या पेंढी – १० रूपये, मेथी -२० ते २२, कोथिंबीर -१५ ते २०, शेवगा -१०ते १२ रूपये नग.
फुले : झेंडू – १२० ते १४०, निशिगंध – १२० ते १५०, गुलाब – २८० ते ३००, गलांडा – १०० ते १३०, शेवंती -१२० ते १३०, आष्टर – १८० ते २००.
फळे : देशी सफरचंद – १२० ते २००, विदेशी सफरचंद – ३०० ते ४००, संत्री – १२० ते १३०, मोसंबी- ५० ते ८०, डाळिंब- १२० ते ३००,चिकू- ६० ते ८०, पेरु- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- १०० ते ११०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ – ८० ते १००, टरबूज -४० ते ६०, केळी – ५० ते ६० डझन, देशी केळी – ७० ते ८० डझन, किवी – १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, तडका बोरे – ६० ते ८०, ॲपल बोरे – ३० ते ५०.
खाद्यतेल : सरकी – १०२ ते १०६, शेंगतेल – १६६ ते १७२, सोयाबीन – १०७ ते ११०, पामतेल – ९८ते ११०, सूर्यफूल – १०२ ते ११२.
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३८ ते ५०, बार्शी शाळू- ५५ ते ७०, गहू- ३३ ते ४४, हरभराडाळ – ७५ ते ७९, तुरडाळ- १६० ते १७०, मुगडाळ – ११० ते ११५, मसूरडाळ – ७८ ते ८२, उडीदडाळ- १२५ ते १३५, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १२५ ते १३०, मसुर- ७०, फुटाणाडाळ – ८३ ते ८५, चवळी- ८८, हिरवा वाटाणा- ९० , छोला -१५० ते १६अंड्याचे दर वधारलेथंडी वाढताच अंड्यांना मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही काहीसे वधारले आहेत. सध्या एका अंड्याच्या ट्रेसाठी १८५-१९० रुपये मोजावे लागत आहेत. तर शेकडा भाव ६२० रुपयांपर्यंत आहे. पाच दिवसात ५५-६० रुपये शेकड्यात वाढ झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *