जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . २३ ) पहूर येथील तायक्वांदो खेळाडू तथा जामनेरच्या इंदिराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गौरी विजय कुमावत हिची मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली .
लातूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद लातूर द्वारा आयोजीत शालेय राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या .
या स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे ५ खेळाडू सहभागी झाले होते .
सदर स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर येथे १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असणारी गौरी विजय कुमावत हिने सुवर्ण पदक जिंकून मध्यप्रदेश येथिल बैतूल येथे होणाऱ्या नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे
तर सानिका सुनिल पाटील हिने कांस्य पदकावर आपली मोहर उमटवली .
लोचना चौधरी व इशांत चौधरी वेदांत क्षिरसागर यांचा उत्कृष्ठ सहभाग राहीला .
त्यांना ईश्वर क्षिरसागर भूषण मगरे क्रीडा शिक्षक तथा प्रशिक्षक हरीभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले .
महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , सचिव भगवान घोंगडे , संचालक मंडळ , मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे , छत्रपती शिवाजी सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्रीकृष्ण चौधरी , जळगाव जिल्हा अथॅलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव , जामनेर तालुका अथॅलेटिक्सचे सचिव गिरीष पाटील , रावेर तायक्वांदो असोसिएशनचे सचिव जिवन महाजन , जय बावस्कर , जय कासार शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व संचालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी अभिनंदन केले .