CM Eknath Shinde: आम्ही रस्त्यांची सफाई करतो, तिजोरीची नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Khozmaster
1 Min Read

आम्ही रस्त्यांची धुलाई करत आहोत, रस्त्यांची सफाई करत आहोत. आम्ही तिजोरीची सफाई आणि धुलाई नाही केली,’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात विरोधकांना लगावला. करोनामध्ये ज्या पद्धतीने जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याचा पाढा मी अधिवेशनात वाचला आहे,’ असेही शिंदे म्हणाले मुंबईतील माजी नगरसेवक हारुन खान आणि त्यांच्या पत्नी ज्योती खान यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाताना शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. ठाण्यातील किसननगर परिसरात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मी मुख्यमंत्री म्हणून रस्त्यावर उतरून काम करतो आहे. मुंबईतील रस्ते पाण्याने ज्या पद्धतीने धुतले जातात, तो प्रकल्प भविष्यात राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. सरकारच्या कामावर विश्वास ठेवून आतापर्यंत ५०हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भविष्यात ही यादी खूप मोठी होणार आहे, असे शिंदे या प्रसंगी म्हणाले.

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *