चिखली मसूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज.:–आज स्व.कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी आपल्या वानप्रस्थ तपस्वी आयुष्याचा काळ ज्या ठिकाणी घालवला त्या प्रेरणास्थळाच्या बांधकामाचा शुभारंभ आज श्री.गुरुदेव दत्त यांच्या जयंती पर्वावर आमच्या आईंच्या हस्ते आज संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या इमारतीच्या डिझाईनला पुरस्कार मिळाले त्याच डिझाईनचे आणि त्याच जगप्रसिद्ध अभियंत्यांच्या सोबत ही इमारत, फक्त पर्यावरण पूरक वस्तूंच्या आधारावर निर्माण होत आहे.
या इमारतीत, भारतीय तत्त्वज्ञान तथा वेद संस्कृती ग्रंथालय विविध दुर्मिळ पुस्तकांचे ग्रंथालय, म्युझियम, आध्यात्मिक ध्यान केंद्र, समाधीस्थळ तथा भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक धरोहरांची माहिती देणारे थिएटर सुद्धा असणार आहे.
कुठल्याही निर्मितीमागे पुढच्या पिढ्यांना दिशा देणारे आत्मविश्वासाचे, आध्यात्माचे प्रेरक बळ देणारे ते केंद्र ठरावे ही शिकवण आमच्या वडिलांची होती.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक दालने ही जनकल्यानाच्या उदात्त हेतूने निर्माण केली. आणि आज ते विद्यामंदिर, सहकार क्षेत्र, उद्योगक्षेत्र हे चिखली सारख्या ठिकाणी, डौलाने उभी राहून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश तेवत ठेवणार्या दीपस्तंभासम बनले आहे.
त्यांच्याच पाऊलखुनांवर आम्ही पुढे जात आहोत. हे प्रेरणास्थळ येत्या ६ महिन्यात आपल्या साठी खुले होईल.