छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पाटोदा भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना व महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले योजना गरीबांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत असल्याने या दोन्ही योजनांचे महत्व विद्यमान पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक बाबुराव (आबा) जाधव यांनी सांगितले असुन या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत कार्ड प्रदान करत आसुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना या योजनेअंतर्गत रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात यामुळे पाटोदा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्यासाठी सर्व पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड धारक यांनी रेशनकार्ड, आधार कार्ड,आधारला लिंक मोबाईल हे कागदपत्र घेऊन आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रात जावा आशे आवाहन पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक बाबुराव (आबा) जाधव यांनी केले आहे.