राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश प्रवक्ते मा. उमेश पाटील व सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या पुढाकाराने अकलूज येथील डॉ. अक्षय वाईकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
काळ बदलत असतो त्यानुसार नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं म्हणत ना. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी श्री. वाईकर आणि त्यांच्या सहकार्यांचं पक्षात स्वागत केलं. यापुढील काळात सोलापूर जिल्ह्यातून पक्षात आणखी प्रवेश होणार आहेत. त्यासाठी २० ते ३० जानेवारीदरम्यान सोलापूरमध्ये कार्यक्रम घेतला जाईल असं ना. अजितदादा यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक पक्ष नव्हे तर एक परिवार म्हणून काम करतो अशी भावना यावेळी ना. अजितदादांनी व्यक्त केली.
२०२३ या वर्षाच्या शेवटी एका तरूण नेत्याचा पक्षात प्रवेश होत आहे, २०२४ या नव्या वर्षातही अशाचप्रकारे आणखी तरूण मंडळी पक्षासोबत जोडली जातील असा विश्वास व्यक्त करत यापुढील काळात युवा कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेत ताकद दिली जाईल असं प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे म्हणाले.
या प्रवेश सोहळ्यास पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, सोलापूरचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह अकलूज आणि सोलापूर जिल्ह्यातून आलेले मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 40