बुलढाणा
Ashoka यांनी उभे केलेले विशाल साम्राज्य हे कष्टकरी बहुजन समाजाच्या हिताचे आणि सुखाचे होते. भारतात सर्वप्रथम पशुंसाठी दवाखाने व गोशाळा उभारण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच दळणवळणासाठी जगातील सर्वात लांब रस्ता व हायवे निर्माण करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते, असे प्रतिपादन सप्त खंजिरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार Satyapal Maharaj यांनी केले.
प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त Priyadarshi Samrat Ashok Janmotsav Samiti च्या वतीने २४ मार्च रोजी Gandhi Bhavan Buldhana येथे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन Dr. Dhammdeep Mahathero यांनी केले. ते Ambedkar Janmabhoomi Mhow चे अध्यक्ष आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश घेवंदे होते.
यावेळी दादासाहेब काटकर, गजानन गिरके, शाहीर डी. आर. इंगळे, गणेशसिंग राजपूत, विजय मोरे, दत्ता काकस, सिद्धार्थ आराख, दामोदर बिडवे, प्रा. डी. आर. माळी, अशोक दाभाडे, आशिष खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्यपाल महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि समतेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आहेत. Sant Tukaram पासून Sant Gadge Baba पर्यंतच्या संतपरंपरेचे विचार त्यांनी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवले.
याच कार्याच्या गौरवार्थ बुलढाणा शहरातील नागरिकांच्या वतीने ‘प्रबोधनकार’ ही उपाधी देऊन सत्यपाल महाराजांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती अध्यक्ष कुणाल पैठणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश खंडेराव यांनी तर आभार प्रा. प्रदीप जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 41