चिखली
Ashoka, Jyotirao Phule आणि B. R. Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथे उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या समितीत विविध क्षेत्रातील अनुभवी, तरुण आणि सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून यंदाचा उत्सव अधिक व्यापक व प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
समितीच्या अध्यक्षपदी विशाल खरात, सचिवपदी अॅड. राजेश जाधव तर कोषाध्यक्षपदी सुमेध जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहसचिव म्हणून राजेंद्र सुरडकर व संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष म्हणून आर. डी. गवई, सुहास हिवाळे, व्ही. टी. गवई, दत्ताराव चव्हाण, दिपीन इंगळे, सचिन कस्तुरे, छोटू कांबळे, दादाराव सोनटक्के, अजय साळवे आणि विकास चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणीत संकेत जाधव, रवी वाकोडे, विनोद बोर्डे, विनोद कळसकर, राजेश बोर्डे, विलास जाधव, विशाल भंडारे, नीलेश साळवे, आनंद गवई, शुभम जाधव, प्रशांत इंगळे, चेतन भालेराव, अतुल साळवे, गौरव इंगळे, रोहित पेंढारकर, रिक्की काकडे, विष्णू मेथे, आकाश महाजन, संजय निकाळजे, प्रशांत डोंगरदिवे, विजयकांत गवई, प्रवीण डोंगरदिवे, विनोद पवार, सिद्धार्थ धंदरे, राहुल पवार, ऋतिक शिनगारे, मिलींद जाधव आदी सदस्यांचा समावेश आहे.
तसेच महिला सदस्यांमध्ये दुर्गा चव्हाण, अश्विनी जाधव, सुप्रिया भटकर, सोनी भिसे, मयुरी जाधव, रत्नमाला सिरसाठ, जया आराख, शालिनी वानखेडे, शीला जाधव आणि प्रमिला जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.
सांस्कृतिक व शिस्तपालन समितीत डॉ. श्याम वाघ, प्रविण खरात, सुधीर जाधव, सुशील शिनगारे, विकास कस्तुरे, राहुल राऊत, सचिन सोसाले व देवानंद साळवे यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून समाजप्रबोधन, विचार जागृती, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Users Today : 41