अविनाश लाड
आज दिनांक बुधवार २७ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त मेहकर येथील अतिशय प्राचीन व पौराणिक महत्त्व असलेल्या श्री.दत्त मठामध्ये सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायण च्या समाप्तीचा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर पारायण चा प.पू.भारती महाराज यांच्या पवित्र वाणीतून परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला.
सदर पारायण च्या समाप्तीचा आरती व महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा सत्यजित परिवाराचे सर्वेसर्वा श्याम उमाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सत्यजित परिवाराचे उपाध्यक्ष सुदेश लोढे,ज्येष्ठ संचालक बाळासाहेब सावजी,संचालक सुरेशजी मुंदडा, डॉ.सुजित महाजन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एस. जोशी तसेच श्री दत्त मंदिर मठाचे स्वयंसेवक अमोल गिरी,योगेश गिरी,विकास गिरी,जीवन गिरी, हरिहर महाराज गिरी व कॉंग्रेसचे युवानेते नितीन तुपे व त्यांचे सहकारी मोठ्या बहूसंख्येने उपस्थित होते.
यावेळी श्याम उमाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सदर श्री.दत्त भगवान मंदिर हे अतिशय पुरातन असून ते इंग्रज राजवटीच्या सुद्धा पूर्वीची असून,त्याला ऐतिहासिक व पौराणिक असे महत्त्व असल्याचे सांगून या मंदिरामध्ये जागतिक दर्जाची प्रसिद्ध अशी एकमुखी श्री.दत्त भगवान ची प्रसिद्ध मूर्ती,व उत्कृष्ट नक्षीकाम असून सदर मंदिराच्या व मठाच्या विकासाकरिता भाविक भक्तांनी भरीव निधीची सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले व श्री. दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन उमाळकर परिवाराच्या वतीने ११०००/- रुपयांची देणगी दिली. व त्यानंतर महाप्रसाद वितरणात सुरुवात झाली सदर महाप्रसादामध्ये भाविक भक्तांकरिता ३ क्विंटल वांग्याची भाजी,पोळी व शि-याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.दत्त मंदिर मठाचे पुजारी तथा सत्यजित अर्बनचे संचालक लक्ष्मण गिरी,शरद गिरी व समस्त गिरी परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.