नववर्षात प्रदर्शित होत आहे “सत्यशोधक” चित्रपट.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ची संघर्ष गाथा आता मोठ्या पडद्यावर येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांसाठी रिलायन्स एंटरटेनमेंट मार्फत प्रदर्शित होत आहे.
समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
“सत्यशोधक” या चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या चित्राची जाहिरात आणि यातील सत्य प्रकटामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा या आधीच झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे महात्मा फुले आणि सावित्री माईच्या माहिती नसलेल्या पैलूचा उलगडा यामध्ये होतो.
हॉटेल ”हरदेव” सिताबर्डी, नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधीशी या चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते, संदीप कुलकर्णी यांनी संवाद साधला. यांच्यासोबत सहनिर्माते, राहुल वानखडे, हर्षा तायडे, कांचन राहुल वानखेडे उपस्थित होते.
समता फिल्म निर्मित, अभिता फिल्म प्रोडक्शन प्रा. लि. प्रस्तुत या चित्रपटाचे लेखक, निलेश जळमकर असून दिग्दर्शन व संकल्पना, राहुल तायडे यांची आहे. निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादुर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत. तर सहनिर्माते, राहुल वानखेडे, बाळासाहेब बांगर, हर्ष तायडे, प्रतीका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. कार्यकारी निर्माते, शिवा बागुल आणि महेश भारंबे हे असून निर्मितीमध्ये निखिल पडघान, देवानंद मोहोळ, मंगला वानखेडे आणि नीता गवळी यांचे मोलाचे योगदान आहे.
0 9 4 2 3 3
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *