घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपींना अटक.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.पाच ठिकाणी केलेल्या चोरीची दिली कबुली*
दिनांक २५ एप्रिल २०२३ ते १२ मे २०२३ दरम्यान
पोलीस ठाणे यशोदा नगर, नागपूर यांच्या हद्दीतील शिवकृपा सोसायटी, यशोधरा लॉन्स मागील भिलगाव येथे राहणारे पंकज नितगोपाल पाल, वय ५७ वर्ष हे त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने घराला लॉक लावून परिवारासह कलकत्ता येथे गेले असता, कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील टेबलावरील तसेच मंदिरामध्ये ठेवलेली चांदीची मूर्ती व सिक्के, पाण्याची मोटर, किया कंपनीच्या कारची चावी, एचपी कंपनीचा लॅपटॉप, २ हार्ड डिस्क, रेडमी कंपनीचा मोबाईल, प्रो गोल्ड कंपनीचा दुसरा मोबाईल, घड्याळ व नगदी ८०००/- रुपये असा एकूण ५५,४२५/- रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी पंकज पाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन यशोदा नगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४,४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या समांतर तपासात यशोदा नगर ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून हुंडा वॉक्समॅन दुचाकी क्र. एमयच ४९ सीई ६६१३ यावरून जाणारे आरोपी वृषभ चंद्रशेखर कावरे, वय 22 वर्ष, राहणार नझुल -ले-आउट, प्लॉट नंबर ३८, जरीपटका, नागपूर तसेच तपेश राहुल बागडे वय २१ वर्ष राहणार नझूल -ले-आउट, एनएमसी ग्राउंड जवळ, जरीपटका, नागपूर यांना थांबवून ताब्यात घेतले असता सखोल विचारपूसी अंती त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. बारकाईने आणखी विचारपूस केली असता याव्यतिरिक्त यशोदानगर ठाणे अंतर्गत २ घरफोडी व बेलतरोडी हद्दीत २ चोऱ्या केल्याचे सुद्धा सांगितले.आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेले साहित्य तसेच चोरी करिता वापरलेली मोटरसायकल असा एकूण १,७८,३५०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील कारवाई परिमंडल क्र.५ चे पोलीस उपायुक्त, निकेतन कदम, जरीपटका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर भेदोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, विलास मोटे, पोलीस उपनिरीक्षक, सचिन भालेराव, सुरज शिरसाट, पोलीस हवालदार, किशोर देवांगन, राहुल बोंद्रे, पोलीस अधीक्षक, संदीप वानखेडे, प्रफुल चितळे मनीष झरकर, दिनेश चौरसिया, पंकज पराते व गोकुल यांनी केली.