बुलढाणा. जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्ह्याचा दर्जा असतांनाही स्वातंत्र्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील रोजगार,उद्योग व्यवसाय,जिल्ह्यातील शासकीय शाळा, कॉलेजेस,सरकारी दवाखाने,सरकारी कार्यालये यांची अवस्था अत्यंत दयनीय स्वरुपाची आहे मात्र या संपूर्ण बाबींकडे लक्ष देणार तरी कोण जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताची ओळख असतांना आज खरोखरच लोकशाहीला शोभेल असा कारभार चालू आहे कां?ह्याची आत्मचिंतन करण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झालेली आहे असो बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणी आणि राजकारणाचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील राजकारण जात-पात, धर्म-पंथ ह्यांच्याशी निगडित आहे लोकांना फक्त भाऊ आमच्या मुलीच्या लग्नाला आले, खासदार साहेब आमच्या घराच्या वास्तुशांतीला आले, आमदार साहेब आमच्या घरी अंत्यविधीसाठी आले, रक्षाविसर्जला आले एव्हढयावरच सर्वसामान्य नागरिकांना राजकारणी भुरळ घालतात विकासाच्या बाबतीत मात्र सर्वसामान्य नागरिकांना आणि राजकारण्यांना काहीही देणेघेणे नाही आपण जर जिल्ह्यात शासनाच्या मोठमोठ्या शाळा,कॉलेजेस आणले तर जिल्ह्यातील युवक युवतींना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल आणि मग त्यांना रोजगार उपलब्ध होईल,एम आय डी सी मध्ये मोठ्या उद्योगांना चालना दिली तर सुशिक्षित आणि अशिक्षित अशा सर्वांना रोजगार उपलब्ध होईल आणि मग आपल्या मागे खासदार साहेब तुम आगे बढो,आमदार साहेब तुम आगे बढो असे नारे द्यायला कुणीही येणार नाही ह्या भितीने तर राजकीय पुढारी ह्याकडे दुर्लक्ष करीत नसतील नां? तसं म्हणावं तर मग स्वतःच्या संस्थेच्या नावाने मोठमोठ्या खाजगी शाळा कॉलेजेस काढले जातात ते कशासाठी तर केवळ पैसा कमविण्यासाठी आणि स्वतःच्या आठ दहा पिढ्यांना ऐशोआरामात जीवन जगता यावे म्हणून कां?
एकीकडे जगाचा पोशिंदा बळीराजा आज देशोधडीला लागला आहे आणि दुसरीकडे खासदारांकडे आमदारांकडे दोन दोन तीन तीन महिन्यांत मोजल्या जात नाही एव्हढी संपत्ती आहे गोरगरीब कष्टकरी कामगार शेतकऱ्यांना रहायला स्वतःचे व्यवस्थित झोपडे सुध्दा नाही आणि दुसरीकडे राजकीय पुढाऱ्यांनी मोठमोठ्या शहरांमध्ये चार चार पाच पाच बंगले घेऊन ठेवलेले आहेत आणि वरुन त्यांचा नारा आहे की म्हणे “८०% समाजकारण आणि २०% राजकारण” बुलढाणा जिल्ह्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आकाशाला गवसणी घालत आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठिकाणी राजकारण्यांनी उद्योग धंदे सुरु करण्याच्या नावाखाली मोठमोठे भूखंडांवर कब्जे केलेले आणि शासनाच्या “रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आंम्ही” ह्या योजने प्रमाणे आपापसात वाटून घेतलेले आहेत या विरुद्ध जिल्ह्यात खेळाडूंसाठी कोणत्याही प्रकारच्या अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.युपीएससी, एमपीएससी च्या परिक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्ह्यात आधुनिक वाचनालयांची वाणवा आहे बुलढाणा जिल्ह्यातील शहरांमधील स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेत शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय भूखंड घशात घातले असल्याने गार्डन अभावी शहरे भकास झालेली आहेत आणि एव्हढे सगळे असूनही बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार वारंवार त्याच त्या उमेदवाराला का मतदान करतात हा खरा बुलढाणा जिल्ह्यातील जनतेच्या आत्मचिंतनाचा विषय असून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत ह्या आत्मचिंतनाचा काही प्रमाणात प्रभाव पडेल कां? हे मात्र येणारा काळच ठरवेल,तूर्तास इतकेचं…!!