नागपूर,दि. 27 : जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विद्यमाने विशेष सहाय्य शासकीय आयटीआय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था उपकेंद्र नागपूर, शासकीय आयटीआय कॉलेज उमरेड मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सीएमईजीपी योजना माहिती व कर्जप्रकरण तयार करणे कार्यशाळेचे आयोजन 29 डिसेंबरला दुपारी 1 वाजता बार्टी, सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्जप्रकरण तयार करण्यासाठी कागदपत्रे, पासपोर्ट साईझ फोटो, आधार कार्ड, पेनस कार्ड, लाइट बील, बँक पासबुक, रहिवासी दाखला, मार्कशिट, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र( दिव्यांग प्रमाणपत्र-लागू असल्यास) या मेळाव्यात येतांना जिल्ह्यातील युवक युवतींनी सोबत आणावे व कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुलकर्णी मो.नं. 9403078760 व कार्यक्रम समन्वयक सारंग मानवटकर 9860009556 तसेच पुष्पलता खिराडे 9423810298 एमसीईडी, उद्योग भवन, सिव्हील लाईन यांच्याशी संपर्क करावा.