यवतमाळ, दि. 27 (जिमाका):- देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यास ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्थामधील सन २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आयुक्तालयाचे दि. १३ जुलै २०२३ च्या जाहिरातीद्वारे मागविण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे. वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे – ४११००१” येथे सादर करावेत.अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख गुरुवार ४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.