सिंदखेडराजा/सुरेश हुसे
तालुक्यातील निमगांव वायाळ रेती घाटातून रेती घाटाच्या मलाई मध्ये गुंतलेल्या महसुल अधिकार्यांवर कारवाई करूण ठेकेदारास काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सिंदखेडराजा येथे तहसील कार्यालयासमोर व निमगांव वायाळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसलेल्या उपोषण कर्ताच्या तब्येत बिघडली मात्र या उपोषणाकडे महसुल अधिकारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की निमगांव वायाळ येथील खडकपुर्णा नदी पात्रातील रेती उत्खननासाठी शासन स्तरावरून रेती घाटाचा लिलाव करण्यात आला असून या रेती घाटातून ठेकेदारानी व महसूल अधिकारी यांनी शासन निर्णयाची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा रात्रन दिवस उपसा करण्याचा सपाटा लावला आहे मात्र या बाबींकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे शासकीय नियमानुसार रेतीची उत्खनन मजुरा मार्फत करावे असा आदेश आसुनही येथे पोकलंडने उत्खनन सुरू आहे तरी पण महसुल विभाग कारवाई करत नसल्याने देवानंद सपकाळ यांनी तहसिल कार्यालयासमोर 22डिसेबर पासुन तर निमगाव वायाळ येथील ग्रामपंचायत सदस्य मधुकर हुसे,समाधान खरात हे 25 डिसेबर पासुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते पण सदर प्रकरणात आर्थिक मदतपुर्ण व्यव्हार होत आसल्याने सदर उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे
निमगांव वायाळ रेती घाटासंबधी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्ते यांच्या तब्येत बिघडली मात्र महसुल विभागाचे उपोषणाकडे दुर्लक्ष
Leave a comment