जेष्ठ संदस्यांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण झालेल्या ४५ ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान व सत्कार
इंडियन जिमखाना यांच्या वतीने धंतोली नागपूर येथील इंडियन जिमखाना (Gymkhana) व्यवस्थापकाने शंभर वर्ष केले असून नुकत्याच झालेल्या आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात रविवारी 24 डिसेंबर रोजी 100 वर्षे पूर्ण केले असून शताब्दी साजरी करण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ सदस्यांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून ४५ जेष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम क्लबच्या मॅरिगोल्ड हॉलमध्ये संपन्न झाला असून डॉ. अनिल सालपेकर डॉ.एम. श्रीगिरीवार हे प्रमुख पाहुणे होते. क्लबला उंचावर नेण्याकरिता ज्येष्ठांचे योगदानाबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाला सुमारे 45 ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष शरद दुरुगकर, माजी अध्यक्ष सी. एस. गुंडेवार, सचिव विलास हरडे, उपाध्यक्ष प्रवीण तुराटे, बिपिन बोंडे आणि विनय झाडे व इतरही पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Users Today : 43