मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदर मावळ विभागाचा ‘राष्ट्रवादी परिवार स्नेह मेळावा’ जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीपदादा गारटकर व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
‘यावेळी पक्षातील जेष्ठ मंडळी, आजी-माजी पदाधिकारी, सहकारी व ग्रामस्थ यांच्यासमवेत संवाद साधून समस्या व सुचना जाणून घेतल्या.आंदर मावळात पहिल्यांदाच एवढा मोठा मेळावा झाला.आंदर मावळची जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत नेहमीच भक्कमपणे उभी राहिल्याने पक्षाची ताकद येथे मोठी आहे.आदरणीय अजितदादांनी या भागातील भविष्याचा विचार करुन विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला.त्यामुळे या भागातील विकासाचा बॅकलॉग भरुन निघत आहे.इंद्रायणी भाताला चांगला भाव मिळत आहे तसेच पॉली हाऊससारख्या आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे.याचा विचार करुन बाजारपेठेशी जलद गतीने कनेक्ट होण्यासाठी येथील मुख्य रस्ते प्रशस्त करण्यात येणार आहेत.तसेच यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळून या भागातील स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.पुढील काळात आपण सर्वांनी सुचवलेली कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हे दादांच्या सोबत असेच राहू द्या.मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले सर्व पदाधिकारी,सहकारी,ग्रामस्थ यांचे आभार मानतो.आपल्या गावाचा,आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वांनी एकजुटीने एकदिलाने काम करा.”
Users Today : 43