अशोकवन जामठा नागपूर येथे दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसीचे ७ दिवसीय NSS शिबीर यशस्वी

Khozmaster
2 Min Read
नागपूर : दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा नागपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटने अशोकवन (जामठा) येथे ७ दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन केले होते. ज्याचा समारोप 24 डिसेंबर 2023 रोजी झाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी 18 डिसेंबर 2023 पासून गावकऱ्यांसाठी मासिक पाळी स्वच्छतासंबंधी जनजागृती तसेच गावात आणि अशोकवनच्या परिसरात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आले. साईनाथ रक्तपेढी आणि इंटिग्रिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गावात पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर तसेच गरजूंना मोफत औषधांचे वाटप यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी स्वच्छतेचे महत्त्व, वृक्षारोपण, आरोग्य सर्वेक्षण आणि बरेच काही. तसेच श्रद्धा फाऊंडेशन टीमचे बेघर लोकांची सुटका आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्यासाठी अतिथी व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष मनोज बालपांडे, व्यवस्थापक प्रतिनिधी सौ. वैशाली बालपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्वला महाजन यांच्या सहयोगाने व महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. अजय पिसे, NSS कार्यक्रम अधिकारी सचिन मेंढी, कृतिका सावरकर, अपूर्वा तिवारी, सचिव उन्नती पाटील व सर्व प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमाने हे ७ दिवसीय शिबीर यशस्वीरित्या पार पडले.
24 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा गावात राहण्याचा अनुभव आणि या शिबिरातून त्यांना काय शिकायला मिळाले व कोणते ज्ञान प्राप्त झाले. तसेच संघ बांधणी, मेहनतीने स्वतःचे अन्न शिजविणे, सामाजिक कार्य आणि बरेच काही अनुभव सांगून शिबिराचा समारोप करण्यात आला.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *