प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ ला स्थापन झालेले हे मंडळ मनपा क्रीडांगणातील हनुमान मंदिर सभागृह, सक्करदरा, नागपूर येथे असून महिन्याकाठी शेवटच्या ३० तारखेला मासिक सभेचे आयोजन करते. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात श्री. व सौ. मनोहर धाबेकर रंजना मलमकर तसेच लता काळे यांनी भाग घेतला. तदनंतर सभेला सुरुवात झाली.आमंत्रित मान्यवर प्राध्यापक रामदास टेकाडे, प्रल्हाद शिंदे व डॉ. दीपक शेंडेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्राध्यापक, रामदास टेकाडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन चारीभाव तसेच ग्रामगीतेवर संबोधन केले, तर प्रल्हाद शिंदे यांनी सेवा निवृत्ती बद्दल केंद्रशासन तसेच राज्य शासन यांच्या वेतन मानात किती तफावत आहे व त्याचे कसे निरसन करण्यात येईल, बद्दल कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघटनेचे सभासद होण्याचे आवाहन केले. जेणेकरून संघटना आपल्या निवृत्ती वेतनाच्या शंकेचे उचित ते निवारण करेल. डॉक्टर दीपक शेंडेकर यांनी जेष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे माध्यमातून स्वास्थ संवर्धन विषयी वेळोवेळी घेण्यात येणारे शिबिराविषयी अवगत केले.
ज्यांचे वाढदिवस या महिन्यात आले तसेच मंडळात नव्याने संलग्न झालेले सभासद यांचा मंडळाचे अध्यक्ष, दयाराम कुरस्कर यांच्या हस्ते त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव, मधुकर दहीकर यांनी केले तर प्रभाकर निगोर यांनी आभार प्रदर्शन केले. मंडळाचे कोषाध्यक्ष, आंबटकर ,सदस्य हटवार, वाघमारे , सौ लता गणेश काळे, नीता भुते, सौ प्रणिता काळे, सौ. प्रतिभा ढेगळे , विक्रांत बागडेकर यांच्या अथक परिश्रमाने स्वरूची भोजनासह सरत्या वर्षाला निरोप दिला गेला.