वाशिम : नोकरदार,चाकरमाने आणि विद्यार्थ्याची होणार गैरसोय.” वाशिम : नविन मोटार वाहन कायद्या विरोधात ट्रकचालक वाहन धारकांसह इतरांनी पुकारलेल्या संपामुळे, गावोगावचा इंधन पुरवठा (पेट्रोल, डिझेल, गॅस टँकरची वाहतूक) बंद पडलेली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेल पंप रिकामे झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक जिल्ह्यातील आगारांनी आपल्या एस टी बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे अक्षरशः वाहतूक यंत्रणा ठप्प झाल्याचे प्राथमिक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत तिर्थक्षेत्र,पर्यटनस्थळ व नातेवाईकाच्या भेटीगाठीकरीता जाणाऱ्या नागरीकांनी काहीदिवस बाहेरगावचा प्रवास टाळला पाहीजे. असे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे. तसेच सदरहू संपाचा गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू, दूध आणि भाजीपाल्याचे भाव वाढवू नये. व ह्या परिस्थितीवर मात करण्याकरीता जिल्हाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, ठाणेदार, बाजार समिती व स्थानिक प्रशासनाने अंकुश ठेवला पाहीजे असी विनंतीही संजय कडोळे यांनी सदर प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाला केली आहे. या संपामुळे शासकिय निमशासकिय कार्यालये, खाजगी प्रतिष्ठान आणि लघुव्यावसायिक, मजूर, कामगारांनाही प्रचंड त्रास होणार असल्याचे स्पष्ट दिसत असून यातही महत्वाचे म्हणजे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे प्रवासाचे हाल होणार असल्यामुळे जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना सवलत दिली पाहीजे असी विनंती सुद्धा जनसेवक या नात्याने संजय कडोळे यांनी केली आहे.