हडपसर येथून सासवड कडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ,माजी नगरसेवक फारूक नाना इनामदार व सहकाऱ्यांसह पाहणी केली. या पालखी मार्गावर हांडेवाडी रोड ते हेवन पार्क येथील रस्त्याची पाहणी केली. तसेच जागा मालकांसोबत चर्चा केली.या रस्त्यामुळे मोहंमद वाडी रोड व हांडेवाडी रस्ता येथील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
जमीन मालकांनी टीडीआरच्या मोबदल्यात आगाऊ ताबा देण्याचे मान्य केले असून याबाबत तरवडे परिवार, जाधव परिवार, जरांडे परिवार, डांगमाळी या कुटुंबियांच्या सोबत चर्चा केली. लवकरच हे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
यावेळी माजी नगरसेवक फारूक नाना इनामदार,मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता रणनवरे, स्थानिक नागरिक शांताराम जाधव, सोपान लोंढे, नंदू जाधव, संदीप जरांडे, अतुल डांगमाळी यांच्यासह तरवडे, जाधव, जारांडे, डांगमाळी परिवार उपस्थित होते.