राज्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त त्यांचे मुळगाव असलेल्या नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थितांना संबोधित केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासमोर तयार करण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. तसेच महाज्योतीच्या नवीन वेब पोर्टलचे लोकार्पण देखील करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘ सत्यशोधक’ या सिनेमाच्या पोस्टरचे देखील यावेळी अनावरण करण्यात आले. राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी लेक लाडकी योजना, महिला बचत गट सक्षमीकरण योजना राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांना बळ देण्यासाठी त्यांच्या वस्तूंना विक्री आणि विपणन करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना ७२ शासकीय वसतीगृहे तसेच नोकरदार महिलांसाठी वसतिगृह योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच नायगावला वर्षभर लोकं यावीत यासाठी या स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपये देण्याचे यावेळी जाहीर केले. विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या १ रुपया योजनेचा फेरआढावा घ्यावा तसेच सावित्रीबाई फुलेंच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात येईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री अतुल सावे, मंत्री कु.अदिती तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.